नागपूर : एसटी महामंडळाच्या काटोल डेपोमध्ये डिझेल संपल्याने एसटीच्या बसेस उभ्या ठेवण्याची पाळी आली. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महामंडळाने मंगळवारी येथील डेपो व्यवस्थापकांना निलंबित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत तातर असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रथम करोना व त्यानंतर कर्मचारी संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती ढासळली होती. हळूहळू महामंडळाने स्थिती रूळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यामुळे एसटीचे काही विभाग आता चांगला महसूल मिळवत आहे. सोमवारी काटोल आगारात डिझेल संपले. त्यामुळे बसेस सुमारे २ ते ३ हजार किलोमीटर धाऊ शकल्या नाही. एसटीच्या या बसेस डिझेलअभावी उभ्या असण्याला येथील डेपो व्यवस्थापकाने योग्य नियोजन केले नसल्याचा ठपका ठेवत मंगळवारी महामंडळाकडून त्यांना निलंबित केले.

हेही वाचा – राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठेही तीव्र हवामानाचा इशारा नाही

हेही वाचा – अकोला : जि.प. पदभरतीत परीक्षा शुल्काच्या नावावर उमेदवारांची लूट, ‘वंचित’ने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

डिझेलच्या नियोजनासाठी डेपो व्यवस्थापक जबाबदार कसा राहील, हा प्रश्न आता उपस्थित केला जात होता. या विषयावर एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katol st depot runs out of diesel and suspends manager read what actually happened mnb 82 ssb
Show comments