लोकसत्ता टीम

नागपूर : निसर्गदेखील कधीकधी त्याच्याच संवर्धकाची परीक्षा घेतो, असे म्हणतात ते काही खोटे नाही. ज्यांनी आयुष्यभर माळराने जपली, या माळरानात राहणाऱ्या तणमोराला जपले आणि एवढेच नाही तर शिकारी म्हणून शिक्का बसलेला फासेपारध्याला त्यांचे हक्क मिळवून देत त्यांना संवर्धनाच्या कामात सहभागी करुन घेतले.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

तणमोर, त्याचा अधिवास आणि त्याच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावणारा फासेपारधी या सर्वांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कौस्तुभ पांढरीपांडे गेली अनेक वर्ष काम करत आहेत. तेच निसर्ग संवर्धक कौस्तुभ पांढरीपांडे यांच्यासमोर निसर्गाने आजाराचे मोठे आव्हान उभे केले आहे. कौस्तुभ पांढरीपांडे गेल्या एक दशकांपासून अनुवांशिक मधुमेहाशी सामना करत आहे. या प्रदीर्घ मधुमेहाने त्यांना उच्च रक्तदाबाची आणखी एक नको असलेली भेट दिली आहे. दुर्दैवाने, त्याच्या दोन्ही किडन्या आता निकामी झाल्या आहेत. त्याची तीव्रता वाढू नये यासाठी ते गेल्या काही काळापासून उपाययोजना करत आहेत.

आणखी वाचा-उत्कृष्ट संसदपटू! आमदार समीर कुणावार यांना पुरस्कार मिळण्याचे कारण काय…

असे असले तरीही त्यांची एकंदरीत प्रकृती गेल्या काही वर्षांपासून सतत खालांवत चालली आहे. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांनी आता पूर्णपणे काम करणे बंद केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे आठवड्यातून दोन-तीन वेळा डायलिसिस होत आहे. नजीकच्या भविष्यातही हे असेच सुरू राहण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. या सर्व उपचार, डायलिसिस, औषधोपचारांचे वेळापत्रक यामुळे त्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. कामाच्या नुकसानीमुळे आणि कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे.

आणखी वाचा- लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवली; अजित पवारांची कबुली, म्हणाले ‘कापूस, सोयाबीनला…’

घरातील गरजा आणि दैनंदिन गरजा पूर्ण करू शकणारे कोणतेही काम पार पाडण्यात ते असमर्थ आहेत. पुढील १२ महिन्यांच्या घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पुढील सहा महिन्यांसाठी डायलिसिससाठी २.४० लाख रुपये खर्च येणार आहे. थोडक्यात, एकूण २४.४० लाख रुपयांची तात्काळ आवश्यकता आहे. प्रदीर्घ आजारपणामुळे त्यांच्याकडे असलेली थोडीफार बचत आधीच संपवली आहे. या संकटावर मात करण्याचा आणि तातडीची आर्थिक गरज पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग सर्वांची गरज त्यांना आहे. ही मदत त्यांच्या जीवनात प्रचंड बदल घडवून आणू शकते. फसवणुकीचे प्रकार होतात म्हणूनच मदतीसाठी मित्रांनी “helpkaustubh.in” हे संकेतस्थळ तयार केले आहे.