बुलढाणा : खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर यंदा प्रथमच खामगाव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाला आज सोमवारी संध्याकाळी आयोजित निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने प्रारंभ होणार आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्या मंगळवारी श्री गणेशाची स्थापना करण्यात येईल.
२० सप्टेंबर रोजी संगीत रजनी, २१ ला गीता परिवार संगमनेरचे, संजय मालपाणी यांचे भगवदगीतेवरील निरूपण, २२ सप्टेंबरला शिवकालीन मर्दानी शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २३ तारखेला पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांचे उद्बोधन करणार असून अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांची पत्नी गौरी थोरात या जिजाऊ माँसाहेब हा एकपात्री प्रयोग सादर करतील. २४ तारखेला सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात येईल. हनुमान गणेशोत्सव समितीच्या वतीने राजा रयतेचा हे शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील महानाट्य सादर केले जाईल. २५ ला सकाळी ९ ते १२ दरम्यान रक्तदान शिबिर पार पडणार आहे.