बुलढाणा : भारताच्या चांद्रयान मोहिमेत खामगावचाही महत्वाचा वाटा असून यामुळे शहराच्या इतिहासात  गौरवास्पद कामगिरीचे पान जोडल्या गेले आहे. काल दुपारी अवकाशात झेपावलेल्या  चंद्रयानात खामगाव एमआयडीसी मधील विकमसी फेब्रीकेशनचे थर्मल शिल्ड आणि श्रध्दा रिफायनरीच्या सिल्व्हर स्टलिंग ट्युब वापरण्यात आल्या आहेत. ही खूप मोठी उपलब्धी असून यामुळे आपल्या खामगावची देशात नवी ओळख निर्माण झाली आहे.

भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान- ३ मोहीम कालपासून सुरु झाली आहे. थर्मल शिल्ड बनविण्यासाठी प्रचंड मेहनत लागली आहे. सिल्व्हर स्टलिंग ट्युब  मध्ये ९० टक्के चांदी आणी १० टक्के तांबे वापरण्यात आले आहे. यापूर्वी  सिल्व्हर स्टलिंग ट्युब विदेशातून मागविण्यात येत होत्या. मात्र आता खामगावातील ट्युब वापरण्यात येतात अशी माहिती श्रध्दा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली आहे. चंद्रयानात लागणाऱ्या वस्तु खामगावातून जाणे ही संपूर्ण खामगाव जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.

Story img Loader