लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : दीड वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत बेपत्ता झालेल्या दिनेश प्रकाश बावणे यास सातारा जिल्ह्यातील सांगवी गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो येथील समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावचा रहिवासी आहे. १८ जून २०२२ रोजी त्याने गिरड हद्दीतील मुलीचे अपहरण केले होते.

आणखी वाचा-भाचीच्या लग्नावरून परतताना अपघात, निवृत्त शिक्षकाचा पत्नीसह मृत्यू

सदर मुलीशी जवळीक साधून ती घरीच असताना त्याने फूस लावून पळविले. मुलीच्या वडीलांनी तक्रार केली. तशीच मुलाच्या वडीलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक शाखेकडे सोपविण्यात आला. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष तपास सुरू झाला. त्यात हे दोघे सांगवी गावात एका कंपनीत मजुरी करतांना दिसून आले. दोघेही या गावात भाड्याने राहत होते. आरोपीने पीडित मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. पोकसो सह अन्य गून्ह्या खाली त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास आता गिरड पोलीस करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapping of minor girl accused found in satara pmd 64 mrj
Show comments