लोकसत्ता टीम

बुलढाणा: पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी व तिच्या भावास बुलढाणा जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी मानवीय भूमिकेतून दिलेला निर्णय, खटल्याचे वैशिष्ट्य ठरले.

भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची प्रकार धाड नजीकच्या डोंगरूळ शिवारात ६ जून २०२१ रोजी घडला होता. या घटनेतील मृतकाचे नाव ज्ञानेश्वर पांडुरंग वरपे असून ते भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे राहत होते. घटनेच्या दिवशी ज्ञानेश्वर वरपे आपला मुलगा, कृष्णाला घेण्यासाठी त्यांच्या सासरवाडीत (डोंगरूळ येथे) गेले होते. दरम्यान त्यांच्या पत्नीने आणि पत्नीच्या भावाने शेतात नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांनी ज्ञानेश्वर वरपे यांना आपल्या वडिलांसोबत बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर ज्ञानेश्वर वरपे यांच्या भावाने धाड पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दिली.

आणखी वाचा-जम्मूकडे निघालेले सैनिक नागपुरात रेल्वेच्या ‘या’ चुकीमुळे अडकून पडले

पोलिसांनी आरोपींवर भा. द. वी. कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. खटल्यात १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली . गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी युक्तिवाद वादात केली. मात्र आरोपी महिलेवर मुलांची संगोपनाची जबाबदारी तसेच दुसऱ्या आरोपींचे वय लक्षात घेता भां.द.वी चे कलम ३०४ नुसार आरोपी संगीता वरपे हिला ३ वर्षाचचा सश्रम कारावास , दुसरा आरोपी पवन ह्यास ५ वर्षाचा कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश स्वानिल खटी यांनी हा निकाल दिला. तपास पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, तर कोर्ट पैरवी म्हणून हवालदार चव्हाण यांनी सहकार्य केले.

Story img Loader