नागपूर : कळमना परीसरातील पावनगावमध्ये एका युवकाची लुटमार करून त्याचा खून करुन जंगलात फेकणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. रविंद्र दिलीप शर्मा (१९, पुनापूर चौक, पारडी), रितेश सूर्यकांत खडगी (१९, ओमसाई नगर, कटरे सोसायटी, पारडी) आणि अरविंद सुखलाल कटरे (२१, ओमसाईनगर, पारडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या हत्याकांडातील चवथ्या आरोपीचा कँसरने मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 गेल्या १२ एप्रिल २०१३ रोजी पावनगाव रोडवर रात्रीच्या सुमारास वरील तीनही आरोपी लुटमार करीत होती. दरम्यान, दुचाकीने एक युवक आला. त्याला आरोपींनी अडविले. त्याच्या खिशातील दोन लाख रुपये हिसकावून घेतले आणि त्याचा डोक्यात दगड घालून खून केला. त्या युवकाचा मृतदेह काही अंतरावर जंगलात नेऊन फेकून दिला. हत्याकांडाच्या सहा महिन्यांनंतर तीन आरोपींना कळमना पोलिसांनी अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Killing a youth naked three arrested in pavangaon massacre the sub capital adk 83 ysh