शिवसैनिकांनी लावले पोस्टर्स
अमरावती : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावर शिवसेनेचे (ठाकरे गट) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या निषेधाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांच्या छायाचित्रासोबत ‘मातोश्रीशी घेतला मी पंगा…’ हा मजकूर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी ठिकठिकाणी हे फलक लावले आहेत.
किरीट सोमय्या नावाचा विकृत मनुष्य हा ‘ईडी’च्या लोकांना हाताशी घेऊन राजकीय पुढारी, अधिकारी, अभिनेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून नाहक समोरच्यांची बदनामी करतो आता महाराष्ट्रासमोर अशा विकृत माणसाचा खरा चेहरा व माणुसकीला काळीमा फासणारा चेहरा समोर आला आहे, असे पराग गुडधे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी
किरीट सोमय्या यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांचे हे व्हिडीओ समोर येताच विरोधकांनी सोमय्या आणि भाजपवर सडकून टीका करत या व्हिडीओची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.