लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी (२३ जानेवारी) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला आता भाजपा नेते प्रत्युत्तर देऊ लागले आहेत.

बांगलादेशी व रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा प्रकार राज्यभर सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासाठी त्यांनी अमरावतीसह अनेक भागातील जिल्ह्याधिकाऱ्यांना तक्रार दिली असून चौकशी सुरू झाली. त्यानंतर शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही तक्रार देत चौकशीची मागणी केली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नावही गेले, आमदारही गेले. त्यांच्या पक्षाला विधानसभेत यश मिळाले नाही. त्यांचे अनेक नेते पुन्हा बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे उद्घव ठाकरे सध्या तडफडत आहेत असा थेट आरोप केला.

दोन लाखांहून अधिक बांगलादेशी व रोहिंग्याचे अर्ज

दोन लाखांहून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्माचे दाखले बनवले असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. बांगलादेशातून आलेले घुसखोर स्वत:ला भारतीय म्हणवायला लागले आहेत. २०२४ मध्ये केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केली. त्याचा फायदा घेत बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीयत्व सिद्ध करत आहेत. ज्या बांगलादेशी, रोहिग्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले मिळवले, त्यांना बसमध्ये बसवून परत पाठवले जाणार, असेही सोमय्या म्हणाले.

एकट्या अकोला जिल्ह्यात १५,८४५ बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले देण्याचा घोटाळा झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. आकोटमध्ये १८९९, बाळापूरमध्ये १४६८, मूर्तिजापूरमध्ये १०७०, तेल्हारामध्ये १२६२, पातूरमध्ये ३९७८, बार्शीटाकळीमध्ये १३१९ जणांना बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, सन २०२४ च्या निवडणूक आचारसंहितेच्या काळात अकोला जिल्ह्यात अनेकांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बनावट प्रमाणपत्रे मिळवली आहेत. अशा घुसखोरांना बाहेर पाठवावे असेही सोमय्या म्हणाले.

हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळणार

जे हिंदू बांगलादेशातून भारतात आले त्यांना नागरिकत्व देण्यास काहीच अडचण नाही. भारतात आले की, त्यांना नागरिकत्व मिळणारच आहे. केंद्र सरकारने तसा सुधारणा कायदा केला आहे. त्यामुळे हिंदू असल्याचे पुरावे देणाऱ्यांना भारताचे नागरिकत्व मिळणार असेही सोमय्या म्हणाले.