नागपूर : नागपुरातील अजनी रेल्वेस्थानकाला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या, अशी मागणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने मुख्य सचिव किशोर बेहाडे यांनी केली. याप्रसंगी १ ऑगस्टपासून या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीमही राबवण्याची घोषणा करण्यात आली.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्थेकडून नुकताच एक कार्यक्रम घेतला गेला. याप्रसंगी किशोर बेहाडे यांच्या मागणीला उपस्थित समाजबांधवांनी हात उंच करून प्रतिसाद दिला. बेहाडे म्हणाले, १ ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या दिवशीपासून स्वाक्षरी मोहीम या मागणीसाठी केली जाईल. ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी समाज बांधवांनी सहकार्य करावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक मेंढे तर अतिथी म्हणून माजी आमदार मिलिंद माने, सतीश सिरसवाण, चंदन गोस्वामी, पवन मोरे, राजेश हातिबेड, प्रभूदास तायवाडे, लखन येरवार, शंकरराव वानखेडे, संजय कठाले, विनायक इंगोले, जीवन तायवाडे, मुरलीधर रनखांम, सागर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभूदास तायवाडे यांनी तर संचालन व आभार गणेश साळवे यांनी मानले.