लोकसत्ता टीम

चंद्रपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत चंद्रपूरचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सर्वासमक्ष अतिशय स्पष्टपणे जाहीर नाराजी व्यक्त केली. मुनगंटीवार यांचे नाव न घेता भाजपाची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोध व प्रयत्न झाले असेही म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी मंचावर भाजपाचे मुनगंटीवार समर्थक पदाधिकारी उपस्थित होते.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”

कोनेरी तलाव येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार जोरगेवार म्हणाले, मला भाजपाची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोध व प्रयत्न झाले. मी सुरुवाती पासून भाजप कार्यकर्ता आहे. मात्र आश्वासने देऊनही २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोनदा भाजपचे तिकीट नाकारण्यात आले. चंद्रपरकरानी नाना शामकुळे यांचा चेहरा कधीही पाहिला नसतांना त्यांना तेरा दिवसात निवडून दिले. विशेष म्हणजे तेव्हा आम्ही पक्षाचे हित डोळ्यासमोर ठेवून नाना शामकुळे या बाहेरील उमेदवाराचा प्रचार केला. फडणवीस व गडकरी यांनी आमच्यावर अक्षरश: शामकुळे यांना थोपविले. ज्या शामकुळेंना जिल्ह्यात कोणी ओळखत नव्हते. ते येथे अवघ्या १३ दिवसांत विजयी झाले. या विजयाचे बक्षीस म्हणून मुनगंटीवारांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर हंसराज अहिर केंद्रीय राज्यमंत्री झाले. यावेळी मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले. आता पक्षाने तिकीट देण्याची तयारी दाखवल्याने जाहीर विरोध झाला.

आणखी वाचा-“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

जोरगेवार म्हणाले की, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीच आमच्यासारख्यांना घराबाहेर काढले, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे? २०१४ मध्येच भाजपने त्यांना पक्षात स्थान दिले असते तर या जिल्ह्यात भाजपला तीनदा पराभवाला सामोरे जावे लागले नसते, असेही ते म्हणाले. २०१९ व २०२४ अशा दोन लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे पराभवाला सामोरे जावे लागले. मला भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी फडणवीस यांचा सर्वाधिक पाठिंबा मिळाला असेही जोरगेवार यांनी स्पष्ट केले. या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमध्ये भाजपची जागा अडचणीत असताना फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुनगंटीवार यांना पाठिंबा जाहीर केल्याचेही त्यांनी मान्य केले. लोकसभा निवडणुकीत केवळ चंद्रपूर भागात भाजपला ३९ टक्के मते मिळाली होती, तर इतर भागात ही टक्केवारी केवळ ३२ ते ३५ टक्के होती, असा दावाही त्यांनी केला.

आणखी वाचा-“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

फडणवीस भावी मुख्यमंत्री

या जाहीर सभेत आमदार जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला. ते राज्याचे मुख्यमंत्री असून देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगितले.

जाहीर सभेकडे मुनगंटीवारांची पाठ

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात बेबनाव आहे. तरीही वरिष्ठांच्या निर्देशानुसार मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांचा भाजपा प्रवेश केला. मात्र या दोघांमध्ये मतभेद अद्यापही कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेकडे मुनगंटीवार यांनी पाठ फिरवली व गैरहजर राहिले. यातून भाजपात सर्वकाही आलबेल नाही याचे संकेत मिळाले आहेत.

Story img Loader