गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) येथे २१ आणि २२ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे.निमंत्रक गंगाधर मुटे यांनी याबाबत माहिती दिली. शेती अर्थशास्त्राच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी व साहित्य सारस्वतांची कृषी जगाशी सांगड घालून कर्तव्यासाठी प्रेरित करण्यासाठी हे संमेलन आयोजित केल्या जात असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रसंतांचे शेती साहित्यातील कृतिशील कार्य डोळ्यापुढे ठेवून हे आयोजन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गुरुकुंजला होत असल्याचे मुटे यांनी नमूद केले. डॉ. सानप संमेलनाध्यक्ष तर श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे स्वागताध्यक्ष असणार आहेत. नाशिकच्या शेती उद्योग समूह सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे हे उद्घाटक, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखक डॉ. रवींद्र शोभणे व राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे उपस्थित राहणार आहेत.
वर्धा: शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी किशोर सानप
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) येथे २१ आणि २२ जानेवारी २०२३ दरम्यान आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ. किशोर सानप यांची निवड करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-11-2022 at 14:59 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishore sanap as the president of farmer literature conference amy