नागपूर : एक दिवस तुमच्याकडे नळाला पाणी आले नाही तर हाहाकार उडतो, पण प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कशी राबते याची कल्पना कोणाला नसते. ती जाणून घेण्याचा प्रयत्नही कधी कोणी करीत नाही. चला तर जाणून घेऊ या बाबतची माहिती व ‘तो’ चावी फिरवणारा कोण असतो याबाबतची माहिती.

शहरात घरोघरी पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची असून त्यांचा पाणीपुरवठा विभाग ही यंत्रणा हाताळतो. नदीतून घेतलेले पाणी शुद्ध केल्यानंतर ते जलकुंभापर्यंत नेले जाते व तेथून वस्त्यांवस्त्यांमध्ये त्याचा पुरवठा होता. यात सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो ते ‘व्हॉल्व्ह मॅन’. तोच पहाटे उठून व्हॉल्व सुरू करतो व लोकांच्या घरी नळाला पाणी येत. तो व्हॉल्व फिरवणे विसरला तर लोकांना पाणी मिळत नाही. दररोज व्हॉल्व उघडणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यात खंड पडायला नको, त्यामुळे व्हॉल्वमॅन वर्षभर कार्यरत असतो. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होते. प्रत्येक वस्तीमध्ये विशिष्ट ठिकाणी व्हॉल्व्ह पॉईंट असतो, व्हॉल्व्हमॅन रोज सकाळी तो सुरू करतो. त्यानंतर संबंधित वस्तीला पाणीपुरवठा सुरू होतो. वेगवेगळ्या वेळेत शहराला पाणीपुरवठा केला जातो. दुपारीही व्हॉलमॅन काही व्हॉल्व्ह उघडतो व त्यासंबंधित वस्तीतला पाणी देण्याचे काम करतो

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

हेही वाचा – चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनी वेगवेगळ्या घटनांमध्ये पाचजणांचा बुडून मृत्यू

एक व्हॉल्व्हमॅन सरासरी १५ ठिकाणी पाणी सोडतो

एका जलकुंभाची साठवणूक क्षमता २२ लाख लिटरची असते व त्यातून सरासरी १० ते १५ हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक वस्तीत विशिष्ठ ठिकाणी वॉल्व्ह असतो. तो केव्हा उघडायचा व बंद करायचा याच्या वेळा ठरलेल्या असतात. ही जबाबदारी व्हॉल्व्हमॅनवर असते.

हेही वाचा – साहेब… अवैध दारू विक्री थांबवा, महिलांचे संसार वाचवा

शहरात ११० व्हॉल्वमॅन

शहरात महापालिकेचे एकूण ५९ जलकुंभ आहेत. यातील पाणी घरोघरी पोहोचवण्याच्या यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्हॉल्व्हमॅनची संख्या ११० आहे. एका व्हॉलमॅनला किमान १५ ते २० वस्त्यांमधील व्हॉल्व्ह उघडण्याची व बंद करण्याची जबाबदारी असते.