Adhik Maas 2023: यंदा अधिक मास आल्याने सण लांबणीवर पडले आहेत. आज १८ जुलैपासून पवित्र अधिकमासाला प्रारंभ झाला. १६ ऑगस्टपर्यंत अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक श्रावण मास’ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, श्रावण मासापूर्वी येणार्‍या अधिक मासाला ‘श्रावण अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्‍या मासाला ‘निज श्रावण मास’ म्हणतात. अधिक मास एखाद्या मोठ्या पर्वाप्रमाणे असतो. त्यामुळे या मासात धार्मिक कृत्ये करतात आणि ‘अधिक मास माहात्म्य’ ग्रंथाचे वाचन करतात.

एका अमावास्येपासून पुढील मासाच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे ‘चांद्रमास’ असतो. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदु धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे ठरलेली आहेत. चांद्रमासांची नावे त्या मासात येणार्‍या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडली आहेत. ऋतू सौरमासाप्रमाणे ठरलेले आहेत. सूर्य अश्विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी येतो. तेवढ्या काळाला ‘सौरवर्ष’ असे म्हणतात.

हेही वाचा… शोधा बघू! लोभस ‘ गोसावी ‘ हरवलाय कुठे?

चैत्र ते आश्विन या सात मासांपैकी एक मास ‘अधिक मास’ म्हणून येतो. क्वचित फाल्गुन मासही ‘अधिक मास’ म्हणून येतो. अधिक मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करण्यामागे शास्त्र आहे. प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिक मासात सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र आणि सूर्य यांच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे पालट होतात. ‘या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये; म्हणून या मासात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत’, असे शास्त्रात सांगितले आहे.

हेही वाचा… …अखेर ‘बाईपण भारी देवा’चे फलक झळकले

अधिक मासात श्री पुरुषोत्तमप्रित्यर्थ एक मास उपोषण, आयाचित भोजन, नक्त भोजन करावे अथवा एकभुक्त रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते. तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते. ‘या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना अन् व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे.

हेही वाचा… नागपूर शहरात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ; सहा महिन्यात ५७६ अपघात, १४१ जणांचा मृत्यू

या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे. तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. एक मास तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते. गोपूजन करावे. गोग्रास घालावा. अपूपदान (अनारशांचे दान) करावे. अधिक मासात सतत नामस्मरण केल्यास श्री पुरुषोत्तम कृष्ण प्रसन्न होतो. नेहमीच्या काम्य कर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्य कर्मांचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रत ग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा आदी करू नये, असे शास्त्रात म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know more about shravan adhik maas ppd 88 dvr