नागपूर: नववर्षाचे स्वागत सर्वसामान्य नागरिकांकडून जल्लोषात करण्यात आले. परंतु, सोने- चांदीच्या दराने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. नागपूरसह राज्यभरात स्वागताचा जल्लोष केला गेला. त्यासाठी काही कुटुंबीयांकडून शेती, फार्महाऊस, पर्यटन स्थळ अथवा हाॅटेल्स वा इतरत्र कार्यक्रम आयोजित केले होते. या नववर्षात, लग्न, वाढदिवस वा इतर कार्यक्रमात काही नागरिक आपल्या जवळच्या नातेवाईकांना विविध दागिन्यांची भेट देत असतात. त्यामुळे हल्ली नागपूरसह सर्वत्र सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. परंतु मागील काही दिवसांत सोन्याचे दर सातत्याने वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती.
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दराने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात ३१ डिसेंबर २०२४ रोजी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर घसरले होते. परंतु नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दर वाढले. नागपुरातील सराफा बाजारात ३१ मार्च २०२४ रोजी बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. हे दर १ जानेवारी २०२५ रोजी दुपारी प्रति दहा ग्राम ७६ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात ३१ डिसेंबर २०२४ च्या तुलनेत १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. ही वाढ २४ कॅरेटमध्ये ६०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ४०० रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. येत्या काळात आणखी वाढ होण्याचे संकेत असल्याने ही सोने- चांदीच्या दागिन्यात गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.
हे ही वाचा… २१ दिवस, ३०० किलोमीटर आणि तीन राज्यातून वाघिणीचा प्रवास…आता तिला…..
हे ही वाचा… अमरावती : पाच गुंडांकडून युवकाची तलवारीने हत्या….सरत्या वर्षाच्या अखरेच्या दिवशी…
चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
नागपुरातील सराफा बाजारात ३१ डिसेंबर २०२४ ला दुपारी चांदीचे दर ८६ हजार ५०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आले होते. हे दर १ जानेवारी २०२५ रोजी ८६ हजार ७०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आले. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ रोजीच्या तुलनेत नागपुरात १ जानेवारी २०२५ रोजी चांदीच्या दरात २०० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.