वर्धा : चालू वर्षातील येत्या १६आँक्टोबर बुधवारच्या मध्यरात्री आश्विन पोर्णिमा असल्याने त्याच रात्री आपणास कोजागिरी पोर्णिमा सण साजरा करता येणार असल्याचे सांगण्यात येते. आश्विन महिन्यात पावसाळा संपूर्ण गेल्याने आकाश निरभ्र असते. वातावरणात धूलिकण नसतात. चंद्राचे टिपूर चांदणे पडते, त्या चांदण्यात आपल्या मित्र-आप्तेष्टांसह,नातेवाईक यांच्या सह मौजमजा करता, यावी यासाठी हा नैसर्गिक उत्सव प्रचारात आला असावा, अशी आख्यायिका आहे.
कोजागिरी पोर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची मनोभावे पुजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. मध्यरात्रीच्या सुमारास लक्ष्मी ही चंद्र लोकातुन भूतलावर उतरते. आणि “कोजगर्ति”म्हणजे कोण कोण जागा आहेत, असे विचारते.जो जागृत असेल त्याच्यावर ती मनोभावे प्रसन्न होवून, त्यालाच उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे पुराणात सांगण्यात आलेले आहे.
हे ही वाचा…काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत गोंधळ; पर्यवेक्षकासमोरच खासदार-आमदार समर्थक भिडले
“कोजागर्ति”याचा अर्थ केवळ शारीरिक दुष्टया कोण जागा आहेत असा नाही तर शरीराची,घराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात योग्य दिशेने, अथक परिश्रम करण्यात ,वेळ पाळण्यात, शिस्तीचे व नैतिकता, नीतीकर्तव्याचे कसोशीने पालन करण्यात कोण जागा आहेत, असा त्याचा अर्थ आहे. जिथे ठाईठाई स्वच्छता आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे. जिथे नितीमान,साधनसुचिता पाळणारे लोक राहतात, जिथे योग्य व चांगल्या दिशेने सतत परिश्रम करणारी माणसे राहतात, तिथेच लक्ष्मीला अशा ठिकाणी राहायला आवडते, असे म्हटल्या जाते. यावर्षी येणाऱ्या कोजागिरीस दुग्धशर्करा योग आलेला आहेत. या आश्वीन पोर्णिमेच्या रात्री १६ आणि १७ आँक्टोबर रोजी वैशिष्ट्यपूर्ण सूपरमूनचे दर्शन होणार आहेत. वास्तविक पाहता पुथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचे पुथ्वीपासुन सरासरी अंतर ३लाख८४हजार किलोमीटर आहे. पोर्णिमेच्या दिवशी चंद्र पुथ्वीच्या जवळ आला तर आपल्याला सूपरमून दर्शन घडते. अशावेळी चंद्रबिंब १४%टक्के जास्त मोठे आणि ३०टक्के जास्त प्रकाशित दिसते.१७आँक्टोबंर रोजी पुथ्वी पासून चंद्राचे अंतर हे ३लाख ५७हजार १७कि.मी असते. या दिवशी चंद्र हा पुथ्वी जवळ येणार आहे.
आश्विन पोर्णिमेचा प्रारंभ बुधवारी रात्री ८वाजुन४१मिनिटानी होणार असुन समाप्ती ही गुरुवार रोज १७आँक्टोबंर रोजी सायंकाळी ४वाजुन ५६मिनिटांनी होणार आहे. बुधवार १६आँक्टोबर रोजी चंद्रोदय सायंकाळी ५.२७वाजता होणार असून रात्रभर चंद्र आपल्याला आकाशात नयनरम्य दर्शन देणार आहे. तसेच गुरुवार १७आँक्टोबंर रोजी सायंकाळी ६.०९वाजता चंद्रोदय होणार असुन संपूर्ण रात्रीच्या दरम्यान आपल्याला निरभ्र आकाशात दर्शन देणार आहे.
हे ही वाचा…९.४८ लाख ग्राहकांना शून्य वीज देयक! ‘ही’ आहे योजना…
खगोलप्रेमी शिक्षक अविनाश टाके सांगतात की या रहस्यमय खगोलीय घटना पाहण्यासाठी विविध शास्त्रज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, खगोलप्रेमी नागरिक चातकासारखी आतुरतेने वाट पाहत असतात. सौरमालिकेतील आपल्या पुथ्वी ग्रहाचा छोटा उपग्रह असलेल्या चंद्राच्या किमया पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी येणाऱ्या कोजागिरी पोर्णिमेला चंद्राच्या विविध छटा, मनमोहक दर्शनाचा विशेष लाभ घ्यावा. म्हणूनच आकाशातील हा डोळ्याचे पारणे फेडणारा हा नजराणा विद्यार्थ्यांनी पाहावा. रात्री बारा नंतर जागे राहुन चंद्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी दिशादर्शक पाऊल उचलावे, असे मला वाटते.