लोकसत्ता टीम
अकोला: जिल्ह्यातील रिक्त १४७ कोतवाल पदांसाठी राबविण्यात येत आलेल्या भरती प्रक्रियेत शहरातील १२ केंद्रांमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली. त्यामध्ये तीन हजार ५१३ उमेदवारांनी कोतवाल पदाची परीक्षा दिली असून, १२१ उमेदवार या परिक्षेला गैरहजर होते. शांततेच्या वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडली.
आणखी वाचा-नागपुरात कावीळचा धोका वाढला, कोणत्या भागात किती रुग्ण पाहा…
गावपातळीवर महसूल प्रशासनातील कामकाजाची महत्त्वपूर्ण भूमिका कोतवालांकडून बजावली जाते. जिल्ह्यात कोतवालांची १४७ पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रिक्त असलेली कोतवालांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी गेल्या ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत १४० पदांसाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर तीन हजार ८८५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन हजार ५१३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. गुणवत्ता यादीनुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.