नागपूर : बागेश्वर धामचे वादग्रस्त पुजारी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कुणबी समाज क्षुब्ध झाला असून धीरेंद्र महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करणार आहे. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी या वादग्रस्त महाराजांना जादूटोणा कायद्याअंतर्गत क्लिनचीट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी एका प्रवचनात संत तुकाराम महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करीत त्यांचा अवमान केला. समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे अखिल कुणबी समाजाचे पदाधिकारी माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा >>> MLC Election : अमरावती पदवीधर मतदार संघात बाद फेरीची मतमोजणी सुरूच; निकालास विलंब, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

धीरेंद्र कृष्ण महाराज स्वयंघोषित कथाकार आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे समस्त कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात तुकाराम महाराज यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह विधान करण्याची हिंमत करणार नाही, असे पडोळे म्हणाले. यावेळी उमेश वर्षे, राजेश काकडे, पुरुषोत्तम शहारे, अवंतिका लेकुरवाळे, बाबा तुमसर, सुरेश जिचकार, विजय शिंदे व रमेश ढवळे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunbi community aggressive against dhirendra krishna maharaj rbt 74 ysh