Kunbi Organizations in Vidarbha : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने विदर्भातील कुणबी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नागपुरात आज विविध कुणबी संघटनांनी बैठक घेतली आणि सरकारचा एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय घेतला.

मराठावाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण त्यांना दिले जाऊ नये, अशी भूमिका कुणबी समाजाने घेतली आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरही सरकारने योग्य ते पाऊल उचलले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल’, असा इशारा अखिल कुणबी समाजाने दिला.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

हेही वाचा – शेत जमिनीचे बनावट दस्‍तावेज तयार करून फसवणूक

माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, काँग्रेसचे नरेंद्र जिचकार आणि अखिल कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली.

यात कुणबी समाजातील सर्वच उपजातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये. असे झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. महाराष्ट्र बंद पुकारला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारला सचेत केले आहे, असे पुरुषोत्तम शहाणे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – नाना पटोले स्पष्टच म्हणाले, “मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय”

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये. ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत. त्यात मराठा जातीचा समावेश केल्यास ओबीसींचे नुकसान होईल, असे अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या.

आज ठरणार आंदोलनाची रूपरेषा

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी कुणबी समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारपासून लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.