गडचिरोली : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा नदीपत्रात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात एकच खळबळ उडाली आहे. रोहित राजेंद्र तुलावी (२०,रा. जैतपूरटोला ता. कुरखेडा) असे मृत तरुणाचे नाव असून तो २५ जानेवारीला सकाळी फिरायला गेला होता. मृत्यूचे गूढ कायम असून घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षात शिकणारा रोहित मागील दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. घरी आई – वडील, वृध्द आजी व बहीण असा हा परिवार. शेतीसह मजुरी करुन गुजराण करणाऱ्या रोहितची पोलीस बनण्याची इच्छा होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे आई वडील शेतीसह मजुरी करायचे. एकुलत्या एक मुलाला खाकी वर्दीत पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण दुर्दैवाने त्याचा मृतदेह आढळून आला. रोहित रोज सकाळी पोलीस भरतीचीही तयारी करायचा. त्यासाठी पहाटे उठून तो धावायला व व्यायामाला जात असे. २४ रोजी रात्री नित्याप्रमाणे जेवण करुन झोपी गेला. त्यानंतर पहाटे तो गायब होता. फिरायला गेला असावा असे समजून कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह कुंभीटोला मार्गावरील सतीनदीपात्रात आढळल्याची बातमी आली अन् कुटुंबाला धक्काच बसला. नदीपात्रात पाणी नव्हते.

Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
vidhan sabha election 2024, Armory, Gadchiroli,
बंडखोरीमुळे गडचिरोलीत महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ, गडचिरोलीतील तीन विधानसभेत काँग्रेसकडून ७ तर भाजपचे दोघे अपक्ष लढण्यावर ठाम
Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
Rohit Sharma Warned by Umpires Due to Sarfaraz Khan as He was Sledging Daryl Mitchell During IND vs NZ 3rd Test Watch Video
IND vs NZ: सर्फराझ खानमुळे वैतागलेल्या मिचेलने पंचांकडे केली तक्रार, रोहित शर्मा मात्र युवा खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभा, पाहा काय घडलं?
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”

रेतीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. बनियान, शर्ट व स्वेटर बाजूला काढून ठेवलेले होते, तर अंगावर केवळ पँट होती. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील खरे कारण उजेडात येईल, असे पो.नि. महेंद्र वाघ यांनी सांगितले. सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे ते म्हणाले.

मृत्यूचे गूढ कायम

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रोहित तुलावी याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब शहरात कळवली. त्यानंतर सतीनदीपात्रात मोठी गर्दी झाली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे वातावरण शोकमग्न झाले होते. रोहितचा मृत्यू नेमका कसा झाला, तो कोणासोबत व्यायामाला गेला होता, हे पोलिसांच्या चौकशीतच समोर येणार आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण नाहीत, त्यामुळे मृत्यूमागचे गूढ वाढले आहे.

Story img Loader