वाशीम : सध्या सोयाबीन पीक काढणीचे काम जोमात सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत मळणी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढणीचे काम मजुरांमार्फत केले जात आहे. मालेगाव तालुक्यातील सूदी शेतशिवारात गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी मळणी यंत्रात अडकून ३२ वर्षीय विलास खुळे या युवकाचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून काम करताना कुटुंबाच्या जबाबदारीचा विचार करून काम करा, असे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : नागपूरचा ‘मिहान’ प्रकल्प ठरू शकतो का उद्योग क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’?

हेही वाचा >>> धक्कादायक ! आठवीची मुलगी पाच महिन्यांची गर्भवती ; तरुणावर गुन्हा दाखल

सध्या सर्वत्र मळणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन पीक काढणीच्या कामाची धांदल सुरू आहे. त्यातच पाऊस कधी येईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी सोयाबीन काढणी करण्याला प्राधान्य देत आहेत. सोयाबीनच्या हंगामात शेतमजूर सोयाबीन सोंगणी, काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथील विलास खुळे गावातीलच कदम यांच्याकडे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतो. १३ ऑक्टोंबर रोजी इंगळे यांच्या शेतात मळणी यंत्रामध्ये सोयाबीनचे काड लोटत असताना अचानक तोल गेल्याने विलास जखमी झाला. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मागील काही वर्षांपासून मळणी यंत्रामध्ये अडकून मजुरांच्या मृत्यूच्या घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader