धम्मचक्र प्रवर्तनदिन
अशोका विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयानी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, येथील गैरसोयींचा फटका देशभरातून आलेल्या या आंबेडकरी अनुयायांना बसला.
ऑक्टोबर ‘हीट’ कमी व्हायचे नाव घेत नसून दिवसा उकाडा आणि रात्री गारवा, असा तापमानातील मोठा फरक गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरकर अनुभवत आहेत. दिवसा दीक्षाभूमीवर उभे राहून होत नव्हते तरी घामाच्या धारा पुसत लोक दीक्षाभूमीला चिटकून होते. स्टॉलधारकांना निदान एकेक पंखा देण्याची गरज होती. मात्र, तो दिला गेला नाही. सायंकाळी नागपुरातील काही भागात पावसाचा शिरवा आल्याने वातावरण नरमले. मात्र, २० ऑक्टोबरपासूनच दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांच्या राहण्याची, खाण्याची, वाहनांची, आरोग्याची फार गैरसोय झाली. भोजनदान करणाऱ्या अनेक आंबेडकरी संघटनांची पोलिसांशी बाचाबाची झाली. ‘लोक भुकेले असून त्यांना अन्न मिळायला हवे’, असा पवित्रा घेऊन अनेकांनी थेट दीक्षाभूमीच्या स्तुपाजवळच्या रस्त्यांपर्यंत जेवणाची मोठेमोठी भांडी पोहोचवून अनुयायांची भूक भागवली.
स्थानिक प्रशासनाने भोजनदान, पाणी आणि फिरत्या प्रसाधनगृहांची त्या त्या मार्गावर एक दीड किलोमीटरच्या अंतराने सोय केली. मात्र, बुधवारी, २१ ऑक्टोबरच्या रात्रीपासून सर्व व्यवस्था कोलमडली. मंगळवारपासूनच येण्यास सुरुवात झालेल्या अनुयायांकडचीशिदोरी संपलेली होती. त्यामुळे बुधवारी रात्री लोक भुकेने त्रस्त होते. बजाजनगर चौक, वर्धा मार्गावरील राजीव गांधी चौक, त्यानंतर चुनाभट्टी, डॉ.भाऊसाहेब कोलते ग्रंथालय, अंबाझरी तलाव, वर्धा मार्गाला समांतर असलेला वसंतनगरापासूनचा नीरीचा मार्ग, आठ रस्ता चौकापर्यंतचा मार्ग अनुयायांनी व्यापले होते.
पोलिसांचे कठडे आणि त्यानंतर भोजन व्यवस्था चुकीच्या पद्धतीने उभारली गेली होती. त्या ठिकाणी गर्दीतून जाऊन पुन्हा दीक्षाभूमीवर मुक्कामी येणे अनुयायांना कठीण होते.
दीक्षाभूमीवर खेडय़ापाडय़ातून, दूरवरून येणाऱ्या लोकांना आरोग्य सेवाही मोठय़ा प्रमाणात असते. मात्र, ती ऐन अशोका विजयादशमीच्या दिवशी पुरवली जाते. आदल्या दिवशी लोकांना थोडी फुरसत असते आणि दुसऱ्या दिवशीच खऱ्या अर्थाने अनुयायांना आरोग्य सुविधांची गरज असते. मात्र, दुसऱ्या दिवशी आठ-नऊ वाजल्यापासून सर्व आरोग्य शिबिरांचे कार्यक्रम आटोपते घेतले जातात. लोक दुरदुरून येतात, मग येथील वातावरण, पाणी, भोजन आणि रात्रीची झोप न होण्यामुळे लोक अर्धमेले होतात. त्यामुळेच तेथे जाण्याच्या दिवशीच त्यांना आरोग्यसेवा पुरवणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया अनुयायांनी व्यक्त केल्या. दीक्षाभूमीवर जागा नसल्याने अनेक लोक फुटपाथवर, डांबरी रस्त्यावर, एवढेच नव्हे, तर आजूबाजूच्या इमारतींच्या प्रांगणात झोपले होते. त्यामुळे दीक्षाभूमीवरील जागा वाढवण्याची गरज असल्याचे अनुयायांचे म्हणणे पडले.
सदानंद फुलझेले यांची खंत
गुरुवारी ५९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सरचिटणीस सदानंद फुलझेले म्हणाले, दीक्षाभूमीचा व्याप दिवसेंदिवस वाढत असून शासन मुंबई, दिल्ली, लंडन येथील जागा ताब्यात घेऊन डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारत आहे. मात्र, दीक्षाभूमीच्या आजूबाजूला असलेली एक इंच जागाही द्यायला तयार नाही. जवळची सार्वजनिक आरोग्य विभागाची एवढी मोठी जागा असताना शासन जागा देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.