चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठल्या वस्तूंची मागणी कधी वाढेल याचा नेम नाही. एरवी अस्थमा रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम  प्राणवायू यंत्राचा (ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर) वापर करोना महामारीत अनेक पटींनी वाढल्याने त्याचा बाजारात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे हे यंत्र मिळत नसल्याने चिनी बनावटीचे तुलनेने कमी दर्जाचे यंत्र चढ्या दराने विकले जात आहेत.

हवेपासून प्राणवायू तयार करणाऱ्या यंत्राची निर्मिती अमेरिके त के ली जाते. तेथून भारतात ते आयात के ले जाते. यातून मिळणारा प्राणवायू ९४ टक्के शुद्ध असतो, असा दावा विक्रे ते करतात.

नागपुरातही अनेक व्यावसायिक या यंत्राची विक्री करतात. ग्रामीण भागातील रुग्णालये आणि अस्थमा रुग्ण हे त्यांचे तसे ग्राहक. साधारणपणे ८० हजार रुपयाला एक यंत्र अशी याची किं मत आहे.  साधारणपणे जून ते फे ब्रुवारी यादरम्यान अस्थमा रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज भासते, त्यामुळे ते हे यंत्र घरी ठेवतात. करोनाच्या दुसऱ्या  लाटेत प्राणवायूचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. रुग्णालयात खाटाही उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांनी बाजारात उपलब्ध अमेरिकन बनावटीचे यंत्र खरेदी करणे सुरू के ले. शासकीय पातळीवरही त्याची गरज भासूू लागली.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनीही छोटी यंत्रे करोना साथीत उपयोगी पडणारी असल्याने ती मोठ्या संख्येने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. अचानक मागणी वाढल्याने बाजारात या यंत्राचा तुटवडा निर्माण झाला. दुसरीकडे अमेरिके तही करोनाची साथ असल्याने तेथेही या यंत्राची मागणी वाढल्याने त्यांनी निर्यात कमी के ली,  त्याचाही परिणाम यंत्राच्या बाजारातील उपलब्धतेवर झाला.

दरम्यान, मागणी वाढल्याने बोगस यंत्रही बाजारातआले. त्यातून तयार होणाऱ्या प्राणवायूची शुद्धता कमी असल्याचा दावा विक्रे त्यांनी के ला. चिनी बनावटीचे यंत्र सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. २० ते २२ हजार रुपये किं मतीचे हे यंत्र काही विक्रे ते गरजूंना ७० ते ८० हजार रुपयांना विकत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

प्राणवायू यंत्र (ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर) विक्रीच्या क्षेत्रात मागील १६ वर्षांपासून काम करणारे तुलसी हेल्थ सव्र्हिसेस निशांत आदमने म्हणाले, सध्या बाजारात प्राणवायू यंत्राचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. पूर्वी दहा हजार यंत्र येत होती. आता एक हजारही येत नाही. त्यामुळे बाजारात चिनी बनावटीच्या तुलनेने निम्न दर्जाच्या यंत्राचा सुळसुळाट वाढला आहे. या यंत्रातून मिळणारा प्राणवायू शंभर  टक्के शुद्ध नसतो. त्यामुळे शासनाने अशा प्रकारच्या यंत्राच्या विक्रीवर बंदी घालायला हवी.

भाडे वाढवा, पण यंत्र परत मागू नका…

विक्रे त्यांकडून हे यंत्र रुणांना भाड्यानेही दिले जाते. पूर्वी महिन्याला ८ ते ९ हजार रुपये प्रतिमहिना असे भाड्याचे दर होते. करोना काळात ते १५ ते २० हजार झाले आहे. अनेक जण गरज संपल्यावरही भविष्यातील भीतीपोटी हे यंत्र परत करत  नाही. आम्ही त्यांना भाडेवाढीचा इशारा देतो, पण ग्राहक त्यासाठी तयार असतात.पण यंत्र परत करीत नाही, असे विक्रे ते निशांत आदमने यांनी सांगितले.