बुलढाणा: पावसाळा संपला असला तरी यंदा  पावसाची तूट कायम आहे. याचा परिमाण रब्बी हंगामावर होण्याची शक्यता असतानाच आता परतीच्या पावसावर जिल्ह्याची भिस्त असल्याचे चित्र आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनियमित व अपुऱ्या पावसाची नोंद झाली. अंतिम टप्प्यात काही तालुक्यात दमदार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती सुधारली. मलकापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १११.१६ टक्के पावसाची नोंद झाली. याखालोखाल शेगाव ९५ टक्के, जळगाव ९३ या तालुक्यात दमदार पावसाची  नोंद झाली. मात्र इतर ९ तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाण्यात ४० टक्के तूट

बुलढाणा तालुक्यातील तूट लक्षणीय असून केवळ ६१ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस किती अपुरा हे स्पष्ट होते. चिखली ६४,  लोणार६७,  संग्रामपूर ७० मधील तूट गंभीर आहे. उर्वरित पाच तालुक्यात ७४ ते ८५ टक्के पावसाने हजेरी लावली.

पेरा घटणार?

 दरम्यान अपुरा पाऊस  व जमिनीतील ओला चा अभाव लक्षात घेता रब्बीच्या पेऱ्यात घट येण्याची शक्यता आहे. दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली तरच हे चित्र बदलेल. जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र कमीअधिक १ लाख ४० हजार  हेक्टर आहे. पावसाने’ परत’ हुलकावणी दिली तर पेरा १ लाखाच्या आसपास जाईल.तसेच गव्हाचे पेरा क्षेत्र कमी होऊन हरभऱ्याची जास्त लागवड होण्याची दाट शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of rain signs affecting the rabi crops depend rain scm 61 ysh
Show comments