ज्योती तिरपुडे-खोब्रागडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांची कोंडी ही नित्याचीच बाब

प्रसाधनगृहांअभावी शाळा, आठवडी बाजार, विद्यापीठांसारख्या सार्वजनिक स्थळी महिलांची होणारी गैरसोय रेल्वे आणि बसस्थानकावरही कायम आहे. उपराजधानीतील  इतवारी, अजनी आणि मुख्य रेल्वेस्थानकावर काही सुविधा चांगल्या आहेत. मात्र, प्रवाशांची संख्या लक्षात घेता या सुविधा अपुऱ्या ठरतात. सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाने घालून दिलेल्या प्रमाणानुसार लोकसंख्येच्या तुलनेत प्रसाधनगृहे आणि लघुशंकागृह कमी आहेत.

मुख्य स्थानक आणि अजनी रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेशी तर इतवारी रेल्वेस्थानक हे दक्षिण मध्यशी जोडले आहे. पूर्वी इतवारी रेल्वेस्थानकाकडे जाण्याचा मार्ग आणि वस्त्यांची दाटी पाहता प्रवाशांची फारच गैरसोय व्हायची. मात्र, आता उड्डाण पुलावरून थेट स्थानकाच्या फाटकातच प्रवेश मिळतो. या स्थानकावर रोजच्या ३४ गाडय़ा धावतात. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात रोजचा प्रवास करणारे सुमारे १५ हजार प्रवासी आहेत. रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येकी ६ प्रसाधनगृहे आणि लघुशंकागृह असायला हवीत. मात्र, आमच्याकडे महिलांसाठी प्रत्येकी १२ प्रसाधनगृहे आणि लघुशंकागृह असल्याचे स्थानक व्यवस्थापक श्रीराम यादव यांनी सांगितले. तशीच गोष्ट मुख्य रेल्वेस्थानकाची असून त्याठिकाणी रोजचे ७५ हजार प्रवासी शहरात आणि बाहेर येजा करतात, येणारे प्रवासी जास्त वेळ थांबत नाहीत. गाडीला विलंब असेल तरच प्रवाशी स्थानकावरील प्रसाधनगृहांचा लाभ घेत असतात. येथे पुरेशी व्यवस्था असल्याचे जनसंपर्क अधिकारी वालदे यांनी सांगितले.

असे आहेत निकष

सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाचा विचार केल्यास पहिल्या १००० महिलांसाठी १० प्रसाधनगृहे आणि त्यानंतरच्या १००० संख्येमागे एक असावे. १००० पुरुषांमागे चार स्वच्छतागृहे असावीत आणि त्यानंतरच्या १००० पुरुषांमागे एक याप्रमाणे प्रसाधनगृहे असावीत. त्याचप्रमाणे लघुशंकागृहांची संख्याही पहिल्या १००० पुरुषांमागे सहा आणि त्यानंतरच्या १००० पुरुषांमागे प्रत्येकी एक असायला हवे. बस थांब्यांचा विचार केल्यास थांब्याच्या २५० मीटरमध्ये ही प्रसाधनगृहे आणि लघुशंका गृहे असावीत. त्यात १०० ते २०० महिलांसाठी दोन लघुशंका गृह असायला हवे, तर १०० ते ४०० पुरुषांमागे एक असावे. ५० पुरुषांमागे एक लघुशंकागृह असायला हवे.

मोरभवनात रोज १५ हजार प्रवासी ग्रामीण किंवा इतर जिल्ह्य़ांमध्ये प्रवास करतात. मोरभवन एसटीचे ‘टर्मिनल’ आहे. येथे महिलांसाठी दोन सुलभ शौचालये करार तत्त्वावर आहेत. पुरुषांसाठी ११ मूत्रीघरे (युरेनल्स) आणि तीन प्रसाधनगृहे आहेत. महिला व लहान मुलांकडून पैसे घेतले जात नाहीत. आमच्याकडे पुरेशी व्यवस्था आहे.

– सुशील भुते, स्थानक प्रमुख, मोरभवन

दूध आणि दही विकायला गोंदियावरून दोन दिवसाआड नागपुरात यावे लागते. मात्र, सोबत कोणी महिला नसल्याने प्रसाधनगृहामध्ये जाण्यास भीती वाटते. त्यामुळे स्थानकावरून लांबची जागा पर्याय म्हणून निवडतो.

– सुरेखा सातारडे, प्रवासी