नागपूर : विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींचे मानधन १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होवून दोन महिने होत आले तरी या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही. आपल्या मानधनात वाढ होणार असल्याने मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान केले. मात्र त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. या लाडक्या बहिणींचे मानधन २१०० रुपये कधी करणार ? असे विचारणा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – सलग ४०१ तास संगीत मैफिल! अमरावतीत असाही आगळावेगळा विक्रम…

हेही वाचा – हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…

सध्या राज्यात लाडक्या बहिणींच्या अर्जांची छानणी महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे. यासाठी इतर विभागाचीसुद्धा मदत घेण्यात येत आहे. परंतु या छानणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. छानणीच्या नावाखाली लाडक्या बहिणीचे अर्ज जर रद्द केले तर राज्यभर याच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अनिल देशमुख यांनी पत्रातून दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin yojana application anil deshmukh warning mahayuti government rbt 74 ssb