नागपूर : निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली, सरसकट सर्वांना त्याचा लाभ दिला, मते घेताना कोणतेही निकष लावले नाही आणि आता निकष लावून लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे, अशी जळजळीत टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांनी बोलताना केली.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर कटोरा घेऊन भिक मागण्याची वेळ आली आहे. मते घेताना निकष आठवले नाही आणि सत्ता आल्यानंतर निकष लावून महिला लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे हे चुकीचे आहे.

Chhattisgarh, Mukesh Chandrakar murder,
तरुण पत्रकाराच्या हत्येने समाजमन सुन्न, काँग्रेस नेत्याचा भ्रष्टाचार उघड केल्याने…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Smart electricity meters , elections , mahavitaran ,
निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…
Financial and Cyber Crimes Branch reported that Deepak Sakharam Kulkarnis seized assets remain unreleased
विमानात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी, देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात
minor boy murder , boy Chandrapur murder ,
चंद्रपूर : क्रौर्याची परिसीमा… क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या
Nagpur sweets, Consumers looted by sweets sellers,
सावधान! दिवाळीत मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
Farmer Suicide Attempt Somthana , Buldhana District ,
VIDEO : धक्कादायक ! खरेदी केंद्रावरच शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल! ओरडत म्हणाला…
child found safe under tree , child dense forest,
चमत्कारच! चार वर्षांचा चिमुकला घनदाट जंगलात झाडाखाली सुखरूप सापडला; तीन दिवसांपूर्वी…

हेही वाचा – काय सांगता? भरदिवसा शुक्राच्या चांदणीचे दर्शन! अवकाशप्रेमींसाठी अनोखी पर्वणी

बीड आरोपी अटक प्रकरण

बीड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपी फारार होणे, गुन्हा दाखल होण्यास विलंब होणे हे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचं जे नावलौकिक होत. ते कमी होत चाललं हे दुर्दैवी आहे. आरोपीच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी बीडच्या अधिकाऱ्यांनी काम केले. पोलिसांना आरोपीची माहिती असताना वेळ काढूपणा केला. नागपूर हिवाळी अधिवेशनात कऱ्हाड असल्याची चर्चा होती. त्याबद्दल आव्हाड धस यांनी सभागृहात माहिती मांडली होती, असे वडेट्टीवार म्हणाले. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील लोकं प्रयत्न करत आहे. असे अनेक प्रश्न या भोवताली फिरत आहेत.

प्रामाणिकपणे तपास व्हावा

बीड प्रकरणात तिथे नेमल्या जाणारे अधिकारी त्या मंत्र्याचे, त्यांचेच ऐकतात, त्यामुळे खून प्रकरणाचा तपास प्रमाणिकपणे होणे गरजेचे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. मला एक अधिकारी सांगत होता तुम्हाला एवढं काम करायची गरज काय. आमच्याकडे ४० टक्केच काम होतात बजेटमध्ये होणाऱ्या तरतुदीमधील निम्मे पैसे अधिकारी नेते वाटून घेतात, असा आरोप त्यांनी केला. वाल्मीक कऱ्हाड जीवाला धोका. गंभीर गुन्हात सहभागी असणाऱ्याला कोणापासून धोका असणार असं ते म्हणाले.

हेही वाचा – वाघनखे विक्रीचा प्रयत्न फसला, ताडोबात चार वर्षांपूर्वी…

सामनामध्ये फडणवीस यांची स्तुती

एखाद्या कामाबद्दल कौतुक करणे म्हणजे भूमिका बदलने होत नाही. मीदेखील चांगलं काम करत असेल तर कौतुक करेल.

पालकमंत्री तिढा कायम

२६ जानेवारी येत आहे, २५ ला पालकमंत्री होइल. २७ ला जातील झेंडा फडकवून पुन्हा बदल होइल, अशी सध्याची स्थिती आहे. बंगल्यावरून भांडणे, अमुक खाते मिळाले नाही म्हणून आक्षेप असा प्रकार सुरू आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Story img Loader