नागपूर : लकडगंज पोलीस ठाणे वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आले आहे. गंगाजमुनातील पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या वसुलीमुळे गेल्या काही दिवासांपासून पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गंगाजमुना पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षक किचक आणि महिला पोलीस उपनिरीक्षक नयना माहुलकर यांच्याही कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला होता. तसेच लकडगंज ठाण्याचे ठाणेदार हेमंत चादेवार यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांवर वचक न ठेवल्यामुळे लुबाडणुकीचे प्रकार समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून गंगाजमुना वस्तीत कारवाई करण्याची धमकी देऊन पोलीस अधिकारी काही वारांगणांना पोलीस चौकीत बसवून ठेवत होते. थातूरमातूर कारवाई दाखवून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करीत होते.

हेही वाचा >>>मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून मेगा भरती! तब्बल १८१३ पदांसाठी संयुक्त परीक्षेची घोषणा

ताब्यात घेतलेल्या वारांगनांना पोलीस ठाण्यात नेण्यात येत नसल्याने चौकीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला होता. ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या आदेशाने बुधवारी दुपारी तीन वाजता पोलिसांचा मोठा ताफा गंगाजमुना वस्तीत घुसला. पोलिसांचा ताफा बघताच आंबटशौकीन ग्राहकांनी पळापळ केली. पोलिसांनी वारांगनावर धडाकेबाज कारवाई केली.

काही वारांगना सार्वजनिक रस्त्यावर अश्लील अंगविक्षेप करीत होत्या तर काहींनी अश्लील हातवारे करीत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गुन्हे निरीक्षक साईनाथ रामोड, उपनिरीक्षक नयना माहुलकर, शैलेश वैरागडे, सुनील जाधव, आनंद म्हरसकोल्हे, अर्चना विजेकर, रुपाली सोनोे, संगीता तितरमारे, संगीता लांडे आणि सुकेशनी घोरले यांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा >>>अकोल्यातील हरिहर पेठ भागात पुन्हा वाद; दोन दिवसांत दुसऱ्यांदा…

गेल्या आठवड्याभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गंगाजमुनात बुधवारी अचानक पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात काही वारांगनांना पोलिसांनी पकडून ठाण्यात नेले. या कारवाईमुळे गंगाजमुनात एकच धावपळ उडाली. आंबटशौकीन ग्राहकांची पळापळ झाल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी ताब्यातील सर्वच वारांगनांवर गुन्हा दाखल केला.

छाप्याची लागली होती कुणकुण

गंगाजमुनात मंगळवारी दुपारी बारा वाजता छापा घालण्याचे नियोजन ठाणेदार चांदेवार यांनी आखले होते. मात्र, शिंदे नावाच्या खबऱ्याला गंगाजमुनातील छाप्याची कुणकुण लागली. त्याने वारांगनांपर्यंत पोहचवली. त्यामुळे मंगळवारी गंगाजमुनात सकाळपासूनच शुकशुकाट होता. गंगाजमुनातील वारांगनांनी घराची दारे बंद केले. त्यावरुन वस्तीत छापा पडणार असल्याची माहिती फुटल्याचे लक्षात आल्यामुळे छापा रद्द करण्याची नामुष्की ठाणेदार चांदेवार यांच्यावर आली.

जुगार अड्ड्यावरही अंकुश हवा

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारटोळीतील जुगार अड्डे पुन्हा बहरले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. भुरीया, रोहित, अठ्ठ्या आणि बंड्या यांच्याकडून रिक्षाचालक शिंदेचे “अर्थपूर्ण” संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच बंड्याने दिलेले आठ हजार रुपये पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakadganj police station is in discussion due to the controversial affairs nagpur news adk 83 amy