बुलढाणा: अपघातात निधन पावलेल्या भिकाऱ्याच्या गोधडीमध्ये लाखोची रक्कम, विविध बँकांचे पासबुक, एटीम कार्ड मिळाले. पोलिसांनी प्रामाणिकपणे ती रक्कम मृत भिकाऱ्याच्या परिवाराला सोपविली. दीपक बाबुराव मोरे (वय ४८) असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा – मायावती यांच्या दौऱ्यापूर्वी आकाश आनंद यांची १७ ला नागपुरात सभा
हेही वाचा – नागपूर ते शिर्डी विमान सेवेसाठी प्रयत्न – स्वाती पांडे
८ नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती सायकलवर जात होती. दुचाकीने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची थैली रस्त्यावर तशीच पडून होती. त्या थैलीत लाखो रुपये होते. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविले. सोबतच्या वस्तूंमध्ये गोधडीत आणखी मोठी रक्कम, बँकांची पासबुके, एटीएम कार्ड आणि चिल्लर भरलेली थैली होती. त्यात १ लाख ६३ हजार रोख मिळाले. एका बँकेत २६ हजार, दुसऱ्या बँकेत एक लाख नऊ हजार २८४ रुपये, इतर बँक खात्यात मोठ्या रकमा होत्या. पोलिसांनी मृताची पत्नी चंदा मोरे, मुलगा धम्मपाल यांच्याकडे रक्कम सोपवली.