नागपूर: पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेल्या ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा सध्या फरार असला तरी जाणार कुठे? या प्रकरणात काही लोकांना अटक झाली आहे. त्यालाही होईल. अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
पत्रकारांनी पाटील संदर्भात विचारलेल्या प्रश्नावला उत्तर देताना फडवीस म्हणाले , पाटील जाणार कुठे, त्याचा शोध घेणारच. त्याचे काही सहकारी पकडले आहे. त्याला सुद्धा पकडू. ‘क्राईम कंट्रोल ’ परिषदेत मी सर्व युनिट्सला ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुंबई व नाशिकने कारवाई सुरू केली आहे. हळूहळू राज्यातील सर्वच ठिकाणी कारवाई होईल. केंद्र सरकारनेही याकडे लक्ष घातले असून यासंदर्भात जिल्हास्तरावर समित्या नियुक्त केल्या आहे, त्याही कारवाईवर लक्ष ठेवून आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा… “आरपीआयला राज्यात मंत्रिपद दिल्यास भाजपलाच लोकसभेत फायदा,” रामदास आठवलेंचे भाकीत; म्हणाले…
समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातासंदर्भात प्रसारित झालेला व्हीडीयोची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत संबंधितांवर निश्चित कारवाई केली जाईल. एकीकडे भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल तर दुसरीकडे सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृतीही करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.