गोंदिया: राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा थंडी परतली आहे. आज शुक्रवार ३ जानेवारीला विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे करण्यात आली असून ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात सर्वाधिक थंड गोंदिया असला तरी त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक येतो. विशेष म्हणजे, २ जानेवारीला नागपूरचे तापमान ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यातच गोंदियाचे तापमान ९.८अंश सेल्सिअस नोंदवले होते. मात्र,   आजच्या तापमानावर लक्ष दिल्यास गोंदियाचे कमाल तापमान २८.८ तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसने नोंदवण्यात आले आहे.    नागपूरचे कमाल तापमान ३०.४ व किमान तापमान ९.० एवढे आहे. तर विदर्भातील इतर जिल्हे पाहता ११ अंशाच्या वर तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर : पीएचडीसाठीची गोंडवाना विद्यापीठाची जाचक अधिसूचना रद्द

गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडून आले. आता नवीन वर्षातही वातावरणात बदल दिसून येत आहे. डिसेंबर २०२४ अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पारा घसरलाय. त्यामुळे त्याठिकाणी गुलाबी थंडी जाणवत आहे. तर विदर्भात मात्र अवघ्या २४ तासात वातावरणात बदल झाला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमान साडेपाच अंशाने कमी झाले आहे. परिणामी, विदर्भात विशेषतः गोंदिया जिल्ह्यात बोचर्‍या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

हेही वाचा >>>अमृत महोत्सवी वर्षात आनंदवनला आर्थिक मदतीची गरज

आरोग्यावर परिणाम

यंदा हिवाळ्याला सुरुवात होऊनही अपेक्षित अशी थंडी जाणवली नाही, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्यात पारा घसरून ८ अंशावर आला होता, त्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व आता पुन्हा थंडी असे बदल वातावरण झाले आहे. मात्र, या वातावरण बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून खोकला, सर्दी, ताप आदी आजार बळावले आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढली असून रुग्णांच्या रांगा दिसून येत आहे.

शेकोट्या पेटल्या ….

गारठा वाढल्याने नागरिकांना बोचर्‍या थंडीच्या सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक असल्याने गावोगावी १०-११ वाजतापर्यंत शेकोट्या पेटल्याच्या दिसून आले. तर शहरी भागातही नागरिक बोचऱ्या  थंडीपासून आपला बचाव करताना दिसले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large fluctuations in weather in gondia state sar 75 amy