चंद्रपूर: चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात एका मोठ्या पट्टेदार वाघाची शिकार आसाममधील शिकारींकडून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाम पोलिसांनी हरियाणातून बावरिया जमातीच्या चार जणांना अटक केली आणि गुवाहाटीमध्ये वाघाची ९ फूट लांबीची कातडी आणि सुमारे १९ किलो हाडे जप्त केली आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ वन्यजीव अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक-दोन दिवसात तपासणी करणार आहे.

हेही वाचा… आजपासून अधिकमासाला प्रारंभ; या मासाचे नाव काय? वाचा या काळातील व्रते, पुण्यकर्म करण्यामागील शास्त्र

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वाघांची वाढलेली संख्या बघता शिकारी सक्रिय झाले आहेत. २८ जून रोजी, आसाम पोलिसांनी हरियाणातून बावरिया जमातीच्या चार जणांना अटक केली आणि गुवाहाटीमध्ये वाघाची कातडी आणि हाडे जप्त केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एका व्यक्तीलाही अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल-सावलीच्या जंगलातून वाघाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा.. शोधा बघू! लोभस ‘ गोसावी ‘ हरवलाय कुठे?

ताडोबाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे आणि इतर काही अधिकारी एक-दोन दिवसांत या शिकार प्रकरणाच्या चौकशीसाठी आसामला भेट देणार आहेत. हे पथक गुवाहाटी पोलिस आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वन अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या संदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता आसाम येथे पकडलेल्या शिकारीच्या मोबाईलचे लोकेशन चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दिसून आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक कोर नंदकिशोर काळे व आणखी काही अधिकारी बुधवारी आसामला रवाना होत असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली.