वर्धा : ग्रामीण भागातील हुशार मुलांना चांगल्या दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयात मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. आगामी शैक्षणिक सत्रात अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे आहे.

नवोदयमध्ये प्रवेश घेण्यासाठी हे विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील शासनमान्य शाळेतून दहावीचा अभ्यास झालेला असणे आवश्यक आहे. पाल्याचा जन्म १ जून २००६ ते ३१ जुलै २००८ दरम्यान झालेला असावा. प्रवेशासाठी होणारी निवड चाचणी ही मानसिक क्षमता, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार आहे. हिंदी व इंग्रजी भाषेचा पर्याय आहे. दहावी शिकत असलेल्या शाळेचा व राहण्याचा जिल्हा समान असेल तरच विद्यार्थ्याचा जिल्हास्तरीय गुणवत्तेसाठी विचार केल्या जाणार आहे.

हेही वाचा – नागपूर : मेडिकल-मेयोतील निम्मे डॉक्टर उन्हाळी सुट्ट्यांवर; निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेचा डोलारा

प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आहे. विद्यालयात निवास, भोजन, गणवेश, पुस्तके, स्टेशनरी व अन्य अनुषंगिक सुविधा मोफत आहेत. मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृहे आहे.

Story img Loader