वृन्दावनची ‘लठमार ‘ होळी देशभर परिचित आहे. गोपिका आपल्या पती, प्रियकरास लाठीने मारतात व ते त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत पळ काढतात. यावेळी रंगांची व फुलांची उधळण होत असते. तशीच पण विनारंगांची होळी रविवारला येथील प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित आहे. हे देवस्थान सुप्रसिद्ध उद्योजक बजाज कुटुंबातील विश्वस्त संचालित करतात.
हेही वाचा >>> मोदींचे सरकार येताच हिंदू राष्ट्राची संकल्पना पुनरुज्जीवित – ज्येष्ठ पत्रकार धीरेंद्र झा यांची टीका
या खास होळीसाठी हा परिवार पुण्यातून वर्धेत येत असतो. हयात असतांना राहुल बजाज हे पण हजेरी लावून जायचे. आता अन्य सदस्य आज सायंकाळी येणार असल्याचे व्यवस्थापक अंबिकाप्रसाद तिवारी यांनी सांगितले. तसेच लठमार नृत्य वृन्दावनची चमू सादर करणार आहे. रंग नव्हे तर फुलांची उधळण होणार. त्यासाठी शंभर किलो गुलाब फुले विकत आणल्या जाणार आहे.सामान्यही सहभागी होऊ शकतात.