दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने उच्च न्यायालयात वकील असल्याचे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस न जुमानल्याने त्याने संतापून पोलिसाला मारहाण केली. सर्वांना न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. वैद्यकीय चाचणीसाठी त्याला मेयो रुग्णालयात नेले असता त्याने तेथेही गोंधळ घालत डॉक्टरला शिविगाळ आणि मारहाण केली. यामुळे त्याच्याविरुद्ध दोन पोलीस ठाण्यांमध्ये शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय रामकरण झरवडे (४५) रा. घोडाडोंगरी, बैतूल असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास लकडगंज ठाण्याचे बीट मार्शल आदित्य ठाकूर परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान गंगा-जमुना परिसरात कलमीशाह दर्गाजवळ संजय दारूची बाटली घेऊन लोकांना शिविगाळ करताना दिसला. आदित्यने त्याला फटकारले असता मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात वकील असल्याचे सांगून त्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच जास्त बोलल्यास तुला कोर्टात खेचेल अशी धमकी दिली आणि आदित्यला धक्का देत वाहनावरून खाली पाडले.आदित्यने नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला पोलीस चौकीत आणले.

हेही वाचा : नागपूर : साहित्यिक संमेलनात फक्त भाडे वसूल करायला येतात – डॉ. सुधीर रसाळ

तेथेही संजयने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस संजयला वैद्यकीय तपासणीकरिता मेयो रुग्णालयात घेऊन गेले. तेथे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अकमल रजा हुसेन यांनी ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र विचारले असता संजयने त्यांनाही शिविगाळ करून मारहाण सुरू केली. त्यांनाही न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. डॉक्टरच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी संजय विरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांना संजयजवळ सनदची झेरॉक्स प्रत मिळाली आहे. लवकरच एक पथक तपासासाठी मध्यप्रदेशला रवाना होईल.