लोकसत्ता टीम

चंद्रपूर : सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे गेलेल्या मुस्तफा रमजान शेख यांच्या घराचे कुलूप फोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली. या घटनेचा तपास करणाऱ्या रागनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नरेश डाहुले याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. शेअर बाजारात पैसे बुडाल्याने पोलिस हवालदाराने ही चोरी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान

मुस्तफा रमजान शेख यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्याचा भाऊ इरफान हा मातोश्री शाळेच्या मागे असलेल्या तुकूम येथे आपल्या कुटुंबासह राहतो. ९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ते मक्का आणि मदिना येथे गेले. दरम्यान त्याला घर सांभाळण्यास सांगण्यात आले. मुस्तफा शेख यांनी १३ नोव्हेंबर रोजी भावाच्या घरी जाऊन झाडांना पाणी दिले असता सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले. मात्र १५ नोव्हेंबर रोजी इरफान शेख यांची मुले रेहान व नवाज हे नागपूरहून चंद्रपूर येथील त्यांच्या घरी पोहोचले असता मुख्य दरवाजाचे कुलूप मात्र तुटलेले दिसले. त्यांनी मुस्तफा शेख यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी घरात चोरी झाल्याचे पाहिले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३८०, ४५४ आणि ४५७ नुसार गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-अमरावती : बनावट दस्तावेजांच्या आधारे भूखंडांची परस्पर विक्री

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शनिवारी रात्री बंगाली कॅम्पमध्ये राहणारे गुन्हे शाखेचे हवालदार नरेश डाहुले याला अटक केली. नरेश डाहुले हा घरफोडीमध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्याच्यावर नजर होती, असे सांगण्यात येते. कारण याआधीही त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला सावध केले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने शुक्रवारी रात्री नरेशला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी रामनगर पोलीस तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस हवालदाराच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

Story img Loader