चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या मंडपात रविवार १७ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते माजी मंत्री परिनय फुके, आशिष देशमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सलिल देशमुख एकाच वेळी पोहोचल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित का ठेवले? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची शासनाला विचारणा

हेही वाचा – विवाह इच्छुक मुली हरतालिकेला गौर का घेतात? जाणून घ्या नेमके कारण…

यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार केंद्र तथा राज्य सरकारवर टीका करीत होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा स्थानिक मंत्र्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली असे सांगत होते तेव्हा या भाजपा नेत्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यानंतर माजी मंत्री फूके, देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस आघाडी सरकारवर टीका केली. एकाचं मंडपात काँग्रेस व भाजपा नेते आजूबाजूला बसून आम्हीच कसे ओबीसी समाजाचे तारणहार आहोत, ओबीसी व मराठ्यांना आम्हीच आरक्षण देऊ शकतो हे सांगताना एकमेकांवर टीका करीत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders of bjp and congress entered ravindra tonge hunger strike in chandrapur at the same time rsj 74 ssb