नागपूर : वाघनखाबाबत विरोधी पक्षाकडून टीका होत असली तरी ते काही इतिहासकार नाही आणि त्यांना इतिहास माहीत नाही. सरकारच्या कुठल्याही योजनेला ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे विरोध करत असतात आणि त्यांची ती सवय झाली आहे. त्यामुळे त्यांचे आता पोट दुखणे स्वाभाविक आहे. मताचे तृष्टीकरण करण्यासाठी ते असे प्रश्न उपस्थित करत असतात, अशी टीका राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सुरू असलेले राजकारण बघता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांना मुळात इतिहास माहीत नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलत होते. विरोधी पक्षात टीका करणारी काही विशेष लोक आहेत. ते माहिती न घेत बोलत असतात.
हेही वाचा – विद्यार्थी ‘एमबीबीएस’ शिकण्यासाठी रशियाला का जातात? जाणून घ्या फी व प्रवेशप्रक्रिया
अयोध्येतील प्रभू राम मंदिराचा विषय होता तेव्हाही ती काल्पनिक कथा आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते. राम सेतूचा विषय होता तेव्हाही उच्च न्यायालयात गेले. राज्य सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले की विरोधी पक्षातील नेत्यांना टीका करण्याची किंवा त्याच्या विरोधात बोलण्याची सवय झाली आहे त्यामुळे काही टीका करणाऱ्या किंवा विरोधात बोलणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करत असतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.
१९८० मध्ये विधानसभेत झालेली चर्चा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांनी ऐकली पाहिजे. अतिशय उत्तम चर्चा झाली होती. ती चर्चा ऐकल्यावर त्यांच्या लक्षात येईल असेही मुनगंटीवार म्हणाले. अजित पवार महायुतीमध्ये आहेत आणि ते राहणार आहे. त्यांचा घरवापसी संकेत असल्याचे प्रसार माध्यमांकडून ऐकल आहे, मात्र प्रत्यक्षात ते महायुतीमध्ये राहणार आहे आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढवणार आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची मैत्री आहे आणि ती पुढेही राहील. खरे तर अजित पवार यांची घरवापसी आहे की नाही हे मात्र मला विचारण्यापेक्षा
त्याबद्दल शरद पवारांना विचारले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा – यवतमाळ : जुगार खेळण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण! ‘या’ जिल्ह्याची अशी ओळख चिंतनीय
विवेक मासिकामध्ये काय लिहिले गेले याची माहिती नाही, मात्र काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही त्याबाबत मात्र व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपआपली विधाने व्यक्त करत असतात. गडचिरोलीमध्ये झालेल्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बक्षीस जाहीर केले आहे. तेथील पोलिसांचे अभिनंदन केले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये अनेक उद्योग येऊ पाहत आहेत तर काही उद्योग सुरू झाले आहेत, त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन स्थानिक युवकांना त्यात प्राधान्य दिले जातील, असेही मुनगंटीवार म्हणाले.