बुलढाणा : जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज रविवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यापूर्वी बुलढाण्यासह काही ठिकाणी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी निवासस्थानातून ताब्यात घेतले. दरम्यान, आघाडीतर्फे आज रविवारी सकाळी रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलकांना लगेच स्थानबद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महविकास आघाडीने आज रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’निमित्त बुलढाण्यात येणार असल्याने बुलढाणा शहर पोलिसांनी आघाडीच्या नेत्यांसह सुमारे ३५ आंदोलकाना ताब्यात घेतले आहे.