लोकसत्ता टीम

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या विधी क्षेत्रातील इतिहासात येत्या शनिवारी,२४ ऑगस्ट रोजी एका विक्रमाची भर पडणार आहे. या क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्य स्तरावरील दिग्गज एका कार्यक्रमासाठी बुलढाण्यात येत आहे. यामध्ये मूळचे वैदर्भीयन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती प्रसन्न वैराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय,न्या. तथा नितीन सांबरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी

याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे आठ ते दहा न्यायाधीश, बुलढाणा जिल्ह्यातील न्यायाधीशवृंद, वकील संघाचे पदाधिकारी, वकील मंडळी यावेळी उपस्थिती राहणार आहे. या दिग्गजांची एकत्रित हजेरी बुलढाणा जिल्ह्याच्या आजवरच्या विधी इतिहासातील एक विक्रम ठरावा. यापूर्वी चौदा वर्षा पूर्वी बुलढाणा न्यायालयाच्या एका कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येथे आल्या होत्या. त्यानंतर २४ ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त विधी क्षेत्रातील मान्यवर येथे येत आहे.

आणखी वाचा- MPSC Exam : पाच हजार विद्यार्थ्यांसाठी दोन लाख उमेदवारांचे नुकसान, आता परीक्षा ऑक्टोबरमध्ये?

हे आहे कारण…

बुलढाणा जिल्ह्यात विधी क्षेत्रातील नामवंत येण्यास कारणही तसेच आहे. ब्रिटिश कालीन आणि११५ वर्ष जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे आता रुपडे पालटणार आहे. त्या काळातील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा काया पालट होणार असून त्याजागी अत्याधुनिक अशी सात मजली इमारत उभी राहणार आहे.या नियोजित इमारतीचा कोनशीला समारंभ २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. यावेळी वरील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

असा आहे सोहळा

बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय सावळे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. स्थानिय पत्रकार भवन येथे आज गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधताना कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. ऍड सावळे म्हणाले की, जिल्हा न्यायालयाच्या ११५ वर्ष जुन्या इमारतीचे पुनर्निर्माण होणार असून, वकील संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. बुलढाणा जिल्हा न्यायालयाची मुख्य इमारत सात मजली होणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त अशी ही इमारत पुढील दोन वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वास जाणार आहे. जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ शनिवारी, २४ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते कोनशिला समारंभ होणार आहे.

आणखी वाचा-लाचखोरीविरुद्ध लावलेली भीत्तीपत्रके फाडणाऱ्या कार्यालयातच ६० हजारांची लाच…

या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, उच्च न्यायालय मुंबई चे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालक न्यायाधीश नितीन सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल चंद्रकांत खटी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. कोनशिला समारंभनंतर सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात स्वागत समारोह व विधी साक्षरता जनजागृतीचा कार्यक्रम होईल, अशी माहिती ॲड. विजय सावळे यांनी दिली.यावेळी ऍड आरिफ सैय्यद, धीरज मुंदे, अमोल बल्लाळ, सुभाष वाघ हजर होते.

चोख सुरक्षा व्यवस्था

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना झेड. दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.