ब्रह्मपुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर उदापुर येथे बिबट्याने चक्क कोंबड्यांवर ताव मारला. उदापुर येथे आंबेडकर वॉर्ड येथे प्रकाश संगोळकर यांचे घर आहे.  घराच्या अंगणातच कुक्कुट पालन व्यवसाय असुन कोंबड्या सुरक्षीत राहण्यासाठी तारांची जाळी लावलेल्या शेडमध्ये कोंबड्या व अंडे फोडण्याची मशीन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी ‘या’ पदांसाठी तात्पुरती भरती

घटनेच्या दिवशी प्रकार सांगोळकर हे घरी फोनवर बोलत असतांना अचानक शेडमध्ये असलेल्या कोंबड्या आरडाओरडा करत असल्याचे दिसून आले. काय झाले म्हणून घरमालक कोंबड्यांच्या शेडकडे पाहीले तर त्यांना कुत्रा असल्याचे जाणवले. कुत्रा हाकलण्यासाठी गेले असता तेथे बिबट असल्याचे लक्षात येताच कोंबड्यांच्या दार बंद केले. ही घटना काल रात्री आठ वाजता घडली. घटनास्थळी ब्रम्हपुरी वनविभागाचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, नेमबाज अजय मराठे पोहचले. त्यांनी बिबट्याला जेरबंद केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard attacks chickens leopard attacked a poultry farm near brahmapuri rgc 76 zws