लोकसत्ता टीम

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील सहवनक्षेत्र कार्यालय कोहमारा अंतर्गत येणाऱ्या देवपायली- मोगरा रस्त्यालगत मोहन तवाडे यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्याचा पडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Gulmohra tree fell on a rickshaw in Dombivli, killing the driver during treatment
डोंबिवली एमआयडीसीत झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू

वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक ६६० ला लागून असलेल्या शेतात ही घटना घडली आहे. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवपायली-मोगरा रस्त्यालगत मोहन तवाडे यांचे शेत असून त्यांच्या शेतात विना तोंडीची जुनी विहीर आहे. दरम्यान बुधवारी तवाडे आपल्या शेतावर गेले असता त्यांना विहिरीच्या परिसरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीजवळ जावून पाहिले असता त्यात एक बिबट पडला असल्याचे आढळले.

आणखी वाचा-अमरावती : बिबट मृतावस्‍थेत आढळला, अज्ञात वाहनाची धडक

त्यांनी लगेच याची माहिती सहवनक्षेत्र कार्यालय कोहमाराच्या वन अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान हा बिबट दोन दिवसांपुर्वीच विहिरीत पडला असल्याचा अंदाज लावला जात आहे. या प्रकरणाचा तपास सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, क्षेत्र सहाय्यक नरेंद्र वाढई, वनरक्षक प्रदीप हत्तीमारे पुढील करीत आहेत.

विना तोंडीच्या विहिरी ठरताहेत कर्दळकाळ

नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प सडक अर्जुनी तालुक्याला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात विना तोंडीच्या विहिरी आहेत. दरम्यान शेतातून भटकंती करताना रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी या विहिरीतून पडून त्यांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या विना तोंडीच्या विहिरी वनप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. या विहिरींना लोखंडी कठडे लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

Story img Loader