बुलढाणा: मागील सुमारे अडीच महिन्यापासून बिबट्यांमुळे गाजणाऱ्या गिरडा गावात (वन वर्तुळात) वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा एक बिबट अडकला आहे.ही मादी बिबट असून तिला मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गतच्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्य मध्ये सोडण्यात येणार आहे. अजिंठा पर्वत राजीवर वसलेल्या बुलढाणा तालुक्यातील गिरडा हे गाव घनदाट जंगलाला लागून आहे. गावकऱ्यांच्या शेत जमीनी जंगलाला लागून आहे. बुलढाणा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गिरडा वन वर्तुळातील घनदाट जंगलामुळे या परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचे अधूनमधून दर्शन होते. यात बिबट,अस्वल, तडस सारख्या हिंस्त्र प्राण्यांचा समावेश आहे. मानवी वस्त्या वन्य प्राण्यांच्या अधिवास नजीक आल्याने अलीकडच्या काळात मानव-प्राणी संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in