भंडारा : वाघ आणि बिबटयाच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना जवळील घटना वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात आज दुपारी घडली.भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत मालिपार बीट मधील वाघबोडी तलावाजवळील संरक्षित वनात कक्ष क्रमांक २१४ मध्ये बिबट्याचा मृतदेह आज दुपारी आढळून आला.  घटनास्थळी भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक चौकशी केली असता बिबट्याच्या मानेवर दोन सुळ्यांचे निशाण दिसून आले. भंडारा वन परिक्षेत्रात रावणवाडी, धारगाव, दवडीपार व इतर ठिकाणी वाघांचा वावर असल्यामुळे बिबट्याची येथील निवासी वाघाशी झुंज होऊन त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायंकाळी प्रकाश कमी होत असल्यामुळे सूचना व मार्गदर्शक निर्देशांनुसार बिबट्याचे शव गडेगाव डेपो येथे संरक्षित ठेवण्यात आले असून उद्या सकाळी ७ वाजता पासून उत्तरीय तपासणी करून शवाची विल्हेवाट लावण्यात येईल.