वर्धा : बोर प्रकल्पच्या बफर झोन मध्ये रेहकी गावात बिबट्याने हैदोस माजविला आहे. गत दोन दिवसात चार वासरांचा बळी गेला. मात्र सुरुवातीला हा रानटी कुत्र्यांचा प्रताप असल्याचे सांगणारे वन खाते हा तर बिबट्याचा हल्ला असल्याचे आता मान्य करीत आहे. काही दिवसापासून रेहकी शेट शिवारात वाघाच्या डरकळ्या गावकरी ऐकत आहे. पण या भीतीस कोणी मनावर घेतले नव्हते. येथील शेतकरी गणेश झाडे यांना रविवारी सायंकाळी नदी परिसरात बिबट दिसला. त्यापूर्वी एक मार्चला रात्री दोन वासरांचा फडशा पडल्याचे दिसून आले. त्याची माहिती तात्काळ वन अधिकाऱ्यांना देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप गावकरी करतात.शनिवारी रात्री खुशाल पित्रे यांच्या एका तर पुंडलिक साठोणे यांच्या एका कालवडीस वाघाने भक्ष्य केले. रविवारी सायंकाळी तोच प्रकार घडला. अखेर वन खात्याचा फौजफाटा दाखल झाला. कॅमेरे लागले. तीन दिवसापासून दहशत आहे.शेतात कापूस वेचणी व हरभरा सवांगणीची कामे सुरु आहे. मात्र बिबटची दहशत असल्याने शेतमजूर कामावर जाण्यास तयार नाहीत.

हेही वाचा…नागपूर : चौकात काय चुकले? मृत्यूचा सापळा ठरत आहे अशोक चौक; महापालिका पोलीस प्रशासन गाढ झोपेत

उपविभागीय वन अधिकारी पवार म्हणाले की या परिसरात वाघ नव्हे तर बिबटयाचा वावर पूर्वी पासून आहे. रेहकी खुर्द येथील वासरांचा फडशा त्यानेच फाडला असावा. कॅमेऱ्यात अद्याप तो ट्रॅप झालेला नाही. आता गावोगावी दवंडी पिटण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य ती काळजी घेण्यात येत असून गावाकऱ्यांची भीती दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard terrorizes wardha s rehaki village kills four calves as forest department faces allegations pmd 64 psg