लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपवनक्षेत्रात धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्याला पिजऱ्यांत जेरबंद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा ऱ्हास करीत आहेत, विश्व हिंदू परिषदेची टीका

पाथरी बिटातील मेहा, चिखली या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने परिसरात पिजरे लावले होते. रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पिजऱ्यांत अलगद अडकला.

आणखी वाचा-नागपूर : धरमपेठकडे जायचे… घराबाहेर पडताना हे रस्ते टाळा, वाहतुक कोंडीत अडकण्याची शक्यता

बिबट जेरबंद झाल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. विशेष म्हणजे, जेरबंद करण्यात आलेला बिबट दुसऱ्या एका बिबट्यासोबत जोडीने या परिसरात वास्तव्यास आहे. एकच बिबट जेरबंद झाल्याने दुसरा बिबट जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.