उपराजधानीत गेल्या काही वर्षात बिबट्यांचा वावर वाढला आहे. रविवारी सकाळी जामठा क्रिकेट स्टेडियम जवळ शुअर टेक रुग्णालयासमोर बिबट्याने एका व्यक्तीला जखमी केले होते. वनखात्याच्या चमूने अवघ्या काही तासातच त्याला जेरबंद केले.

हेही वाचा- गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ; वृद्धाला पायाखाली चिरडून केले ठार

शहरालगत असलेल्या वनक्षेत्रामुळे गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. रविवारी सकाळी शुअरटेक रुग्णालयासमोर अचानक बिबट्याने एका व्यक्तीवर झडप घेतली आणि बिबट जंगलात पळून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात त्या व्यक्तीला हलकी दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. हिंगणा पोलीस ठाण्यातून या घटनेची माहिती सेमिनरी हिल्स वरील वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राला देण्यात आली. तातडीने केंद्राची चमू घटनास्थळी पोहचली. त्यांनी जंगलात बिबट्याची शोधमोहीम राबवली.

हेही वाचा- चंद्रपूर जिल्ह्यात आढळला माळढोक; पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण

केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट दिसताच त्याला ट्रॅकवीलायजिंग बंदुकीने बेशुद्ध केले. या बिबट्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात आणले. माणसावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वाहनाची धडक बसली असावी, कारण त्याच्या मागच्या पायाला जखम झाली होती. रस्ता ओलांडताना त्या व्यक्तीवर जखमी बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनी व्यक्त कला. . बिबट्यावर सेमिनरी हिल्स वरील वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात उपचार सुरू आहेत.

Story img Loader