नागपूर : महागाई, बेरोगारी, शेतमालास भाव तसेच तपास यंत्रणेचा दुरुपयोग, आदी मुद्दे घेऊन काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसंवाद यात्रेला प्रारंभ केला आहे. या यात्रेची जबाबदारी प्रमुख नेत्यांमध्ये विभागीयनिहाय वाटून घेण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर विभाग तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष पटोले चंद्रपूर जिल्ह्यात होते तर येथील स्थानिक आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्यात होते. चंद्रपूर जिल्ह्यात वडेट्टीवार यांचा प्रभाव आहे, तर पटोले यांचा भंडारा जिल्ह्यात प्रभाव आहे. पटोले यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पदयात्रा काढताना स्थानिक नेते सोबत राहतील, याची काळजी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या पदयात्रेला अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

हेही वाचा – धुळ्याजवळील अवैध बायोडिझेल पंपावर विशेष पथकाचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा – दोन मालगाड्यांना जोडल्याने प्रवासी रेल्वे गाड्यांना मार्ग कसा मिळतो?

स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याने आणि यात्रेच्यावेळी स्थानिक नेत्यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्यात आल्याने पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी चंद्रपुरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला फारसा प्रतिसाद नव्हता, अशी माहिती स्थानिक प्रतिनिधीने दिली.