वाशिम : लोकसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यासाठी इच्छुक आपलीच उमेदवारी पक्की असल्याचा जनतेत प्रचार करीत आहेत. मात्र, अद्याप कुणाचीच उमेदवारी अंतिम झाली नसून संभ्रम निर्माण करू नये, अशी तंबी दिल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
आगामी लोकसभेची चाचपणी सर्वच पक्षाकडून होत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटातील इच्छुक तयारीला लागले आहेत. काही उमेदवारांनी आपल्याला शब्द दिला असून आपलीच उमेदवारी पक्की असून प्रचाराचा शुभारंभदेखील केला आहे. त्यामुळे कुणाची उमेदवारी पक्की, कोण उमेदवार यावरुन जनतेत व कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होत आहे.
हेही वाचा – नागपूर : कर्ज फेडण्यासाठी खंडणी योजना! काय आहे प्रकरण जाणून घ्या…
हेही वाचा – निवडणुकीच्या फेऱ्यात अडकली ‘पणन’ची कापूस खरेदी!
याबाबत शिवसेना ठाकरे गटाने पत्र काढून इच्छुकांची बोलतीच बंद केली आहे. शिवसेनेने स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की, कोणत्याही लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित केले नाहीत. सर्व पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने उमेदवारी जाहीर होतील, असे स्पष्ठीकरण शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केल्याने इच्छुक उमेदवार मात्र कैचीत सापडले आहेत.