लोकसत्ता टीम

वर्धा : विदेशात भाजीपाला निर्यात करण्यासाठी आवश्यक असणारे परवाना प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देण्यात आले असून राज्यात असे हे पहिलेच उदाहरण ठरले आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात

सेवाग्राम आश्रमात कृषीमाल निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन फलोत्पादन व औषधी मंडळ तसेच सहकार विकास मंडळ यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने केले होते. याच कार्यक्रमात प्रशिक्षीत शेतकऱ्यांना आयातनिर्यात परवाना प्रमाणपत्र देण्यात आले. निर्यातदारांना त्यांचा माल परदेशात पाठवायचा असतो, तेव्हा कस्टम बंदरावर निर्यात परवाना दाखविणे बंधंनकारक आहे. तसेच निर्यातदारांना त्यांच्या खात्यात परकीय चलन मिळते तेव्हा बँकेकडून निर्यात परवाना मागितल्या जातो. या ठिकाणी संपन्न निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात ३२ शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यातील हे पहिलेच उदाहरण ठरले आहे.

आणखी वाचा-चित्ते आता नामिबियाऐवजी दक्षिण आफ्रिकेतूनच; प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकाचे सावध पाऊल

जिल्हाधिकारी राहूल कर्डिले म्हणाले की वर्धा जिल्ह्यातून निर्यात वाढविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असून काही दिवसातच मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्याचे दिसून येईल. आळंदी (पूणे) येथील निर्यातदार जयसिंग थोरवे म्हणाले की वर्धा जिल्ह्यातील केळी, वायगावी हळद तसेच विविध डाळी निर्यात करण्यासाठी उत्तम आहे. या शेतमालांची शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यांना योग्य मोबदला देत निर्यात योग्य माल खरेदी केल्या जाईल, अशी हमी त्यांनी दिली. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यातील शेतकरी या पाच दिवसीय प्रशिक्षणात सहभागी झाले होते.